महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचं काम करत असल्याने त्यांना ईडीची नोटीस येणार नाही : छगन भुजबळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाण्यातील उत्तर सभेमध्ये ( Raj Thackeray Uttar Sabha Thane ) राज ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली ( Raj Thackeray Criticized Chhagan Bhujbal ) होती. त्यावर भुजबळ यांनी राज ठाकरेंना टोला लगावला ( Chhagan Bhujbal On Raj Thackeray ) आहे. राज ठाकरे भाजपचं काम करत असल्याने त्यांना ईडीची नोटीस येणार ( ED Notice To Raj Thackeray ) नाही, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

By

Published : Apr 13, 2022, 4:35 PM IST

मुंबई :छगन भुजबळ यांच्यावर ईडीची कारवाई ( ED Action On Chhagan Bhujbal ) झाली. ते तुरुंगात राहिले आणि तुरुंगात आल्यानंतर पहिल्यांदा शपथ त्यांना देण्यात आली ( Raj Thackeray Criticized Chhagan Bhujbal ) असल्याचा टोला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ( Raj Thackeray Uttar Sabha Thane ) केली. मात्र भारतीय जनता पक्षाबद्दल राज ठाकरे यांनी भूमिका अचानकपणे का ( Raj Thackeray On BJP ) बदलली? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे. आपल्या संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही. हे तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना पोलीस आयुक्तांनी कोर्टात सांगितल आहे. आपल्या संस्थेत सरकारी पैसा नाही. हेदेखील चॅरिटेबल कमिशनरने कोर्टामध्ये स्पष्ट केले. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे काम करत असल्यामुळे त्यांना आता ईडीची नोटीस येणार ( ED Notice To Raj Thackeray ) नाही. राज ठाकरे महाविकास आघाडी ( Raj Thackeray On Mahavikas Aghadi ) आणि चुलत भाऊ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांनी राज ठाकरेंना हा टोला ( Chhagan Bhujbal On Raj Thackeray ) लगावला.



राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे विचार आठवावे :शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, असं राज ठाकरे म्हणतात. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे यांनी आधी प्रबोधनकारांची कारकीर्द आठवावी. प्रबोधनकारांचे लेखन पुन्हा पहावे. प्रबोधनकार हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य क्रांती घडवली. तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाजात समाजक्रांती घडवले असल्याची आठवण यावेळी छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना करून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details