मुंबई- काल दिवसभर तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. जवळपास चारशे ते पाचशे झाड उन्मळून पडले, असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यातील कित्येक झाडे वाहनांवर पडले आहेत, त्यामुळे वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे झाडे रस्त्यावरून उचलले नाहीत, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
दोन दिवसांपासून मुंबईवर घोंगावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाचे संकट टळले असले, तरीही त्याचा प्रभाव दुसऱ्या दिवशीही कायम आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दुसऱ्या दिवशीही पावसाचा प्रभाव कायम