मुंबई -क्रूझ ड्रग्ज प्रकरणात चर्चेत असलेल्या बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 19 दिवसांपासून अर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनचा जामीन नामंजूर झाल्याने तो निराश झाल्याची माहिती आहे. सुरवातील तुरुंगामध्ये आर्यन कुणाशी बोलत नव्हता. मात्र, आता तो इतर काही कैद्यांशी बोलू लागला आहे. आर्यनच्या बॅरेकमध्ये बांधलेल्या मंदिरात दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होते. तेव्हा त्या आरती पूर्ण होईपर्यंत तो तिथेच राहतो असल्याची माहिती जेल प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे.
आर्यन खानची एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे पुस्तकांची मागणी - क्रूझ ड्रग्ज प्रकरण
बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 19 दिवसांपासून अर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगातील वेळ काढण्यासाठी आर्यनने जेल प्रशासनाकडे काही धार्मिक पुस्तकांची मागणी केली असून त्याला ती पुरवण्यात आली आहेत. तसेच गेल्या चार दिवसांपासून आर्यनने आंघोळ केली नसल्याचीही माहिती आहे. तर त्यांच्याकडे पाण्याच्या फक्त तीन बाटल्या शिल्लक राहिल्या आहेत. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी त्याने डझनभर पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या.
जेलमध्ये गेल्यापासून आर्यन खान तेथील जेवण जेवत नसून तो फक्त बिस्कूट खात आहे त्यामुळे त्याच्या आरोग्याची चिंता देखील जेलमधील अधिकाऱ्यांना आहे. तसेच आर्यनने जेल प्रशासनाकडे काही धार्मिक पुस्तकांची मागणी केली आहे. जेलमधील वेळ निघण्यासाठी आता त्याने पुस्तक हाती घेतले आहेत. जेल प्रशासनाकडून आर्यनला मागणीनुसार एक पुस्तक वाचण्यासाठी देण्यात आले आहे. इतर काही पुस्तकदेखील आर्यन खान देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आर्यनला जामीन मिळावा, यासाठी शाहरूखकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. आर्यन खानला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामीन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, यावरची सुनावणी 26 ऑक्टोबरला होईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
शाहरुखने घेतली आर्यनची तुरुंगात जाऊन भेट -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र, प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाहरुख खानला मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणे झाले. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसेच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले.
आर्यनला शाहरुख खानकडून मनी ऑर्डर
तुरुंगामध्ये 11 ऑक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आली आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी 4 हजार 500रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीच्या घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाही.
कारागृहातील अधिकाऱ्यांना आर्यनच्या आरोग्याची चिंता -
तुरुंगातील सुत्रांनुसार, आर्यनचे पोट तीन ते चार दिवसांपासून साफ झालेले नाही. तो शौचालयात जात नसल्याने त्याची प्रकृती बिघडण्याची भीती कारागृह प्रशासनाला आहे. तुरुंगातील कामगारांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आमड प्रभागातील बाबा (कॉन्स्टेबल) आर्यनसाठी काही पार्लेजी बिस्किटे घेऊन आले होते. आर्यनकडे पाण्याच्या फक्त तीन बाटल्या शिल्लक आहेत. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी त्याने डझनभर पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या.
आर्यनची 4 दिवसांपासून आंघोळ नाही -
अरबाजलाही आर्यनसोबत त्याच सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आर्यनच्या घरातून फक्त दोन चादर आणि काही कपडे आले आहेत. कारागृहाने त्याला ब्लँकेट दिले आहे. आर्यनने 4 दिवसांपासून आंघोळ केली नाही. मात्र, कारागृहाच्या नियमानुसार त्याला रोज शेविंग करावे लागते.