2 ऑक्टोंबर रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईत काही जणांना अटक करण्यात आली. आज आर्यन खान तरुंगातून बाहेर आला. तर त्याच्या इतर सहा सहकाऱ्यांचा देखील जामीन मंजूर झाला आहे.
Live Update : अखेर 26 दिवसांनी आर्यन खानची तुरूंगातून सुटका; 'मन्नत' बंगल्यावर दाखल
14:24 October 30
आर्यनच्या सहकाऱ्यांचा देखील जामीन मंजूर
11:03 October 30
आर्यनची सुटका
तब्बल 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांचा ताफा मन्नतकडे रवाना झाला. मन्नत बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रसारमाध्यमांची देखील गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
10:55 October 30
आर्यन खानच्या जामिनाची प्रक्रिया आर्थर रोड जेलमध्ये पूर्ण
10:38 October 30
आर्थर रोड तरुंगाबाहेर चाहत्यांची गर्दी; मोठा पोलीस बंदोबस्त
आर्यनच्या सुटकेची प्रक्रिया सुरू असून त्याला घेण्यासाठी स्वत: शाहरूख खान आर्थररोड जेलमध्ये पोहोचले आहे. सोबतच आर्यनचा सुरक्षारक्षक देखील त्यांच्यासोबत आहे. त्याला बघण्यासाठी चाहत्यांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
10:27 October 30
शाहरूख खानमध्ये पोहोचले
आर्यनच्या सुटकेची प्रक्रिया सुरू असून त्याला घेण्यासाठी स्वत: शाहरूख खान आर्थररोड जेलमध्ये पोहोचले आहे. सोबतच आर्यनचा सुरक्षारक्षक देखील त्यांच्यासोबत आहे.
10:11 October 30
आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' लायटिंगने सजवण्यात आला
आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' लायटिंगने सजवण्यात आला आहे.
09:45 October 30
शाहरुख खान आणि गौरी खान सोबत
आर्यन खानला थोड्या वेळात जामीन मिळणार आहे. त्याला घेण्यासाठी वडील शाहरुख आणि आई गौरी खान गेले आहेत. ते दोघेही सध्या वरळी येथील हॉटेल सीजनमध्ये थांबलेले आहे. तर शाहरूखचा मॅनेजर तुरूंगात पोहचला आहे.
08:05 October 30
आर्यन खान थोड्याच वेळात तुरूंगाबाहेर
- थोड्या वेळात आर्यन तरूंगाबाहेर येणार
- आज सकाळी जामीनपत्र पेटी उघडली असून आर्यनला जामीन मिळणार आहे. शाहरूख खान स्वत: आर्यनला घ्यायला आर्थररोड तरूंगात जाणार आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- काल शुक्रवारी अभिनेत्री जुही चावला हिने आर्यनचा जामीन घेतला. मात्र काही कारणास्तव आर्यन तुरूंगातून बाहेर येऊ शकला नाही.
- ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला तब्बल 26 दिवसांनी म्हणजेच गुरूवारी जामीन मंजूर झाला.