मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ईडी कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
LIVE : ईडी कार्यालय,मुंबई * शरद पवार ईडी कार्यलयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे
* समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल
* मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे तसेच कायदा व सुव्यवस्था आयुक्त विनय चौबे हे दोघेही शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले
* 'कोणाच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला', याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयात जाणार - नवाब मलिक यांची माहिती
* ईडी कार्यालयाकडून शरद पवार यांना नुकताच ई-मेल आला असून, त्यात आपण कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे - नवाब मलिक
* थोडयाच वेळात शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ईडीच्या कार्यालयात दाखल होणार
* ईडी कडून शरद पवार याना मेल द्वारे पत्र पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती , 'सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही', 'पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
* ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये शहराध्यक्ष आनंद परांजपे यांसोबत पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.