महाराष्ट्र

maharashtra

BMC New Additional Commissioner : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आशिष शर्मांची नियुक्ती

By

Published : May 24, 2022, 8:53 PM IST

राज्य सरकारकडून आशिष शर्मा ( Ashish Sharma Municipal Additional Commissioner ) यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या आशिष शर्मा यांना प्रधान सचिव श्रेणीत पदोन्नती देऊन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ( Additional Commissioner Mumbai Municipal Corporation ) या रिक्त पदावर करण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे पद प्रधान सचिव श्रेणीत बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशिष शर्मा
आशिष शर्मा

मुंबई -मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर राज्य सरकारकडून आशिष शर्मा ( Ashish Sharma Municipal Additional Commissioner ) यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या आशिष शर्मा यांना प्रधान सचिव श्रेणीत पदोन्नती देऊन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ( Additional Commissioner Mumbai Municipal Corporation ) या रिक्त पदावर करण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे पद प्रधान सचिव श्रेणीत बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी त्वरित मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त या पदाचा कार्यभार स्वीकारावा अशा सूचना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने केल्या आहेत.


कोण आहेत आशिष शर्मा? :आशिष शर्मा हे १९९७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक जनरेशन कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम केले आहे. पुढे ते केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथे त्यांनी डिपार्टमेंट पर्सनल अँड ट्रेनिंग या विभागात जॉईंट सेक्रेटरी या पदावर काम केले. केंद्र सरकारकडून पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत आल्यावर त्यांची नियुक्त मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.

हेही वाचा -RajyaSabha Elections : मताधिक्यासाठी संभाजीराजेंची मराठा आमदारांवर भिस्त!

ABOUT THE AUTHOR

...view details