महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Antilia Explosive Scare : 'या' कारणामुळे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्माची चौकशी

तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलिस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे.

Encounter fame Pradip Sharma
Encounter fame Pradip Sharma

By

Published : Apr 7, 2021, 7:46 PM IST

मुंबई-मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलिस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दावा करण्यात आलेला आहे की, मनसुख हिरेन यांचे मोबाईल लोकेशन हे अंधेरी चकाला येथे मिळून आले होते. या ठिकाणी प्रदीप शर्मा यांचे घर असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.


विनायक शिंदे, मनसुख व सचिन वाझे यांचे मोबाईल लोकेशन प्रदीप शर्माच्या घराजवळ -

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक आरोपी विनायक शिंदे , सचिन वाझें व मनसुख हिरेन या तिघांचे मोबाईल लोकेशन पडताळले असता यामध्ये या तिघांचेही मोबाईल लोकेशन हे अंधेरी चकाला येथे आढळून आले होते. यानंतर याच परिसरामध्ये प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याचे घर असल्यामुळे त्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेला संशय आहे की, प्रदीप शर्मा, सचिन वाझे, विनायक शिंदे व मनसुख हिरेन या चौघांमध्ये एक मीटिंग पार पडलेली होती. या मिटिंगमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली होती, याचा तपास केला जात आहे.

'या' युट्युबरची होणार चौकशी -

या बरोबरच युट्युब वर प्रसिद्ध असलेल्या निखील मुंबईकर या यूट्यूबरला सुद्धा चौकशीसाठी लवकरच समन्स पाठवले जाणार आहे. याचे कारण म्हणजे अटक आरोपी सचिन वाझे याने निखील मुंबईकर याच्यासोबत लडाख या ठिकाणी स्पोर्ट्स बाईक वरून प्रवास केलेला होता. या दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ सुद्धा युट्युब वर पोस्ट करण्यात आलेला होता. निखील मुंबईकर हा सचिन वाझे याच्या चांगला परिचयातील असून त्याचा जवळचा मानला जात आहे. त्यामुळे निखील मुंबईकरला सचिन वाझेबद्दल आणखीन काही माहिती आहे का, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details