महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांना आज होवू शकते अटक - Sachin Vaze latest news

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरणी एनआयए वेगात तपास करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देखील अटक केली आहे. याप्रकरणी एनआयएकडून आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अँटिलिया प्रकरण
अँटिलिया प्रकरण

By

Published : Mar 17, 2021, 12:10 PM IST

Updated : Mar 17, 2021, 1:06 PM IST

मुंबई-अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी याआधीच सचिन वाझे यांना अटक झाली आहे. त्यानंतर आता यात गुंतलेल्या अन्य अधिकाऱ्यांवरही अटकेची तलवार आहे. त्यांना आज अटक होवू शकते असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

एनआयएचा जलद तपास

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरणी एनआयए वेगात तपास करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देखील अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणात तपासाच्या वेगाला गती मिळत आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन यांना एक मर्सिडिज कार घ्यायला आली होती. हिरेन त्या कारमधून गेले. तर परत आलेच नाहीत, असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयएने ती कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ताब्यात घेतलेली ही तिसरी कार आहे. या प्रकरणात एनआयए संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. यामध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्हीत एक मर्सडिज कार येते आणि मनसुख हिरेन त्या कारमध्ये बसुन जातात. एनआयएला असा संशय आहे की, मनसुख हिरेन हे त्यानंतर बेपत्ता झाले. या प्रकरणी ही मर्सडिज कार तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. या कारची झडती घेतली असता. कारमध्ये पाणी बॉटल, 5 लाख रुपये रोख, पैसे मोजण्याची मशीन व काही कपडे सापडले आहेत. अधिक तपास एनआयए करत आहे. दरम्यान, ही जप्त करण्यात आलेली मर्सिडीज गाडी सारांश भावसार यांच्या मालकीची असून, त्यांनी या गाडीचा सौदा केला होता अशी माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज केले जप्त -

अँटिलिया येथील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी तपासाच्या नावाखाली सीआयू पथकाने ठाण्यातील एका दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. मात्र त्या वस्तू गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सीआययू पथकाने वाझे राहत असलेल्या सोसायटीमध्येही पत्र व्यवहार करून सोसायटी परिसरातले सीसीटीव्ही ताब्यात घेतले. वाझे राहत असलेल्या सोसायटीचे डिव्हीआर वाझेंच्या पथकातील म्हणजे सीआययूच्या अधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारीला हस्तगत केले. तर सदगुरू कार डेकोरेटरच्या दुकानातून बनावट नंबर प्लेट बनवल्या असल्याने तपासाच्या नावाखाली त्या दुकानातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील सीआययूने हस्तगत केला आहे. याचा दुजोरा दुकानाच्या मालकाने दिला आहे.

महत्वाचे पुरावे ताब्यात?

प्रकरणाचा तपास एनआयएकडून जलदगतीने होतं आहे. या प्रकरणी एनआयएने रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीआययू विभागात झाडा-झडती केली. पुराव्याच्या अनुशंगाने झडती करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुरू असताना मुंबई पोलीस दलातले बडे अधिकरीही उपस्थित होते. आता या प्रकरणात नवीन काय खुलासे होतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात एनआयए संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे.

हेही वाचा -भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

Last Updated : Mar 17, 2021, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details