महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राऊत अडचणीत, आरोप करणाऱ्या तरुणीची अजून एक याचिका दाखल - Sanjay Raut against FIR

संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या तरुणीने अजून एका प्रकरणात जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी करताना या याचिकेवर थेट सुनावणी घेता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांना सांगितले.

याचिका दाखल
याचिका दाखल

By

Published : Jun 25, 2021, 7:19 PM IST

Updated : Jun 25, 2021, 7:25 PM IST

मुंबई -संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या तरुणीने अजून एका प्रकरणात जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी करताना या याचिकेवर थेट सुनावणी घेता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांना सांगितले.

याचिकेत काय आहे -

बोगस डीग्री प्रकरणात अटकेत असलेल्या स्वप्ना पाटकर यांना आरोपी केले आहे. याआधी बोगस डीग्री प्रकरणात अटकेत असलेल्या स्वप्ना पाटकर यांचा जामीन अर्ज दंडाधिकारी कोर्टाने फेटाळला होता. त्या निर्णयाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. परंतु स्वप्ना पाटकर यांच्यावतीने ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टाने याची ताताडीने दखल घेण्याची मागणी याचिकेत केली आहे.

राऊतांना प्रतिवादी करा -

बोगस डीग्रीच्या आरोपात अटक झालेल्या प्रकरणात संजय राऊत यांना प्रतिवादी केलेले नाही. जर याचिकेत पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप असेल तर 'त्या' व्यक्तीलाही प्रतिवादी करावे लागेल, असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सल्ला दिला. याचिकाकर्त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाद मागण्याचे निर्देश देत राज्य सरकारला सोमवारपर्यंत यासंदर्भात आपला अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार पाटकर यांच्या जामीन अर्जावर वेळ काढणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो अशी आशा व्यक्त केली. तसेच स्वप्ना पाटकर यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत 28 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली.

बोगस डिग्री प्रकरण काय आहे ?

39 वर्षीय स्वप्ना पाटकर यांना क्लिनिकल सायकोलॉजीची बनावट पीएचडी डिग्री मिळवून रुग्णालयात नोकरी मिळवण्यासाठी अटक केली होती. 26 मे रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 419 (वेषांतर करून फसवणूक), 420 (फसवणूक), 467 (बनावट करणे) आणि 468 (फसवणूकीच्या हेतूने बनावट) अन्वये एफआयआर नोंदविण्यात आले आहे. कागदपत्रांनुसार, छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर येथील 2009 मध्ये जारी केलेले पाटकर यांचे पीएचडी प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात आले.

संजय राऊत यांचावर आरोप -

'शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे सहसंपादक आणि संजय राऊत गेली आठ वर्षे आपल्या शक्तीचा वापर करत आहेत आणि माझ्यासह आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांवर अत्याचार करत आहेत. राऊतांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सप्ना पाटकरवर 'वेश्या व्यवसाय' केल्याचा आरोप केला', असा दावा स्वप्ना पाटकर ह्यांनी केला होता. स्वप्ना पाटकर ह्यांनी आरोप केले की, 2017 मध्ये संजय राऊत यांनी स्वत: फोनवरून धमकी दिली होती आणि 2018 मध्ये त्याने एका माणसाला रीतसर कंत्राट देऊन स्वप्ना पाटकर ह्यांचा पाठलाग करायला लावला होता. स्वप्नाच्या म्हणण्यानुसार त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले गेले आणि कधी सुसाईड नोट्स तर कधी अश्लील साहित्य पोस्ट केले गेले. परंतु संजय राऊत यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवू शकत नाही, असे पोलिसांनी स्पष्टपणे पाटकर ह्यांना सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Last Updated : Jun 25, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details