महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ज्योतिषांनो, निवडणुकीचे भाकीत कळवा अन् 21 लाख बक्षीस मिळवा' - अंधश्रद्धा

निवडणुकीवेळी भविष्यवेते निवडणूक निकालांचे भाकीत वर्तवतात. मात्र हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्या समोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरुन अंधश्रद्धा निर्माण होते. त्यामुळे अंनिसने ज्योतिषांना खुले आव्हान दिले आहे.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

By

Published : Apr 30, 2019, 6:59 PM IST

मुंबई- भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी निवडणूक निकालांचे भाकीत वर्तवतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्या समोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरुन अंधश्रद्धा निर्माण होते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या वृत्ती विरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्व ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून बक्षीस जिंकण्याचे आव्हान केले आहे. निवडणुकीचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख रुपये जिंका असे खुले आव्हानच अंनिसने दिले आहे. याबाबत अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील


लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून चमत्कार करणाऱ्या आणि फलज्योतिष सांगणाऱ्या बुवा-बाबांच्या फसवणुकीच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघर्ष करत आहे. चमत्कार आणि फलज्योतिष यांच्यामधला फोलपणा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या शास्त्रीय मांडणीतून सिद्ध केला आहे. फलज्योतिष व बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्योतिष यांची वारंवार चिकित्सा केली आहे. त्यासाठीच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सारख्या आव्हानाचा पेच त्यांनी ज्योतिषांना समोर मांडला आहे.


या अहवालामध्ये ज्योतिषांनी सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही प्रश्नावली तयार केली आहे. याची उत्तरे भरून प्रवेशिका उत्तरासहीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या नावे कार्यालयात रुपये 1000 प्रवेश धनादेश सीलबंद पाकिटात 20 मे 2019 पर्यंत रजिस्टर पोस्टाने पाठवण्याचे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ज्योतिषांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details