महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Rain - मुसळधार पावसामुळे पशु-पक्षी संकटात, पॉज'सह 'एसीएफ' संस्थेने दिला मदतीचा हात - mumbai animals and birds in crisis news

गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. जागोजागी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र, या पावसाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही, तर मुक्या जनावरांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वूभूमीवर मुंबईतील 'अम्मा केअर फाऊंडेशन' (एसीएफ) आणि 'प्लॅंट अॅण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी' (पॉज-मुंबई)या संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे पशु-पक्षी संकटात, पॉज'सह 'एसीएफ' संस्थेकडून मदतकार्य
मुसळधार पावसामुळे पशु-पक्षी संकटात, पॉज'सह 'एसीएफ' संस्थेकडून मदतकार्य

By

Published : Jul 21, 2021, 3:52 PM IST

मुंबई - गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. जागोजागी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. परंतु, या पावसाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही, तर मुक्या जनावरांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहत्या पाण्यामुळे अनेक सरपटणारे प्राणी रस्त्यावर आले आहेत. अनेक पक्षांना दुखापत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या पशु-पक्षांच्या संरक्षणासाठी 'अम्मा केअर फाऊंडेशन' (एसीएफ) आणि 'प्लॅंट अ्ॅण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी' (पॉज-मुंबई)या संस्था पुढे आल्या आहोत. त्यामुळे हे मुके जीव वाचवण्यास मोठी मदत होत आहे. तसेच, या संस्थेकडून कुठेही असे सरपटणारे प्रणी आढळले, तर त्यांना मारू नका, आमच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात सरपटणारे प्राणी काही घरांत सापड आहेत, तर काही ठिकाणी जखमी अवस्थेत सापडत आहेत. आता या प्रण्यांच्या मदतीसाठी मुंबईतील एसीएफ आणि पॉज या संस्था पुढे आल्या आहेत. त्याबाबतचा हा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

'संस्थेमुळे पुनर्वसन'

पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने अनेक सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत घुसले होते. अशा 16 सर्पांची सुटका अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लॅंट अ्ॅण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थांच्या सेवकांनी केली आहे. यामध्ये सुटका करण्यात आलेले प्राणी खालीलप्रमाणे आहेत.

सुटका करण्यात आलेले प्राणी

2 अजगर - Python (8 फूट आणि 9 फूट) बोरिवली येथून 2 घोणस – Russell’s Viper (4 फूट आणि 3 फूट) बोरिवली आणि वसई येथून 1 मांजऱ्या सर्प – Cat Snake (3.5 फूट) दहिसर येथून 3 नाग – Cobra (1 फूट) दहिसर येथून 1 धामण - Rat snake (8 फूट) राम मंदिर येथून 1 झिलान - Glossy Marsh Snake (1 फूट) वांद्रे येथून 1 तस्कर - Trinket Snake (2 फूट) दहिसर येथून 2 घोरपड - Monitor Lizard (2 फूट) बोरिवली आणि भांडुप येथून 3 घार - Kite (पक्षी - Bird) वांद्रे आणि भांडुप येथून एकूण 16 साप, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची सुटका करण्यात आली.

'आमच्याशी संपर्क करा'

यातील सर्प मानवी वस्तीत घुसले होते. त्यांची सुटका आमच्या संस्थेने केली आहे. त्याबरोबर दोन घोरपड, तीन घारींचाही समावेश आहे. जर, कोणाच्या सोसायटीमध्ये अशाप्रकारे प्राणी येत असतील, तर त्यांनी त्यांना मारू नये, आमच्याशी संपर्क करा असे आव्हान संस्थेचे सुनिष कुंजू यांनी केले आहे. एक घोरपड भांडुप येथे सापडली होती. ती गटारात अडकली होती. तिला गटारातून बाहेर काढले. तसेच, दुसरी घोरपड देखील आम्हाला बोरवलीत सापडली. ती घोरपडही येथे एका गटारात अडकली होती. मी आणि आमच्या स्वयंसेवकांनी या दोघांना वाचवले. त्यानंतर तीला जंगलात सोडले, अशी माहिती कुंजू यांनी दिली आहे.

'पावसाचा फटका'

रोज कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा फटका फक्त सरपटणार्‍या प्राण्यांना नाही, तर पक्षांना देखील बसलेला आहे. आम्ही तीन घारींना देखील वाचवले आहे. पूर्ण भिजलेल्या अवस्थेत या घारी आम्हाला सापडल्या होत्या. या घारीवरती उपचार सुरू आहेत, उच्चार पूर्ण झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. असेही कुंजू यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details