महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh At Chandiwal Commission : अनिल देशमुख,सचिन वाझे चांदीवाल आयोगा समोर हजर - Chandiwal Commission

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या 100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100 crore alleged recovery case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) तसेच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) हे दोघेही चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झाले आहेत.

अनिल देशमुख

By

Published : Dec 13, 2021, 10:49 AM IST

Updated : Dec 13, 2021, 7:22 PM IST

मुंबई :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे मुंबईत चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपां संदर्भात आयोग चौकशी करत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) 100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100 crore alleged recovery case) अटकेत आहेत. 29 नोव्हेंबर रोजी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली होती. ती आज संपत आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे देशमुखांना आज जामीन मिळतो (Bail granted) की पुन्हा त्यांची रवानगी जेलमधे होते हे स्पष्ट होणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपत आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळतो की पुन्हा त्यांची रवानगी जेलमधे होते हे आज स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Dec 13, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details