महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ketki Chitale Controversy : अनिल देशमुखांना जामीन देऊ नये; जामीन दिल्यास ते फरार होतील : केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री (Former Home Minister) यांना जामीन देऊ नये, (Anil Deshmukh Should Not Be Granted Bail) त्यांना जामीन दिल्यास ते फरार होतील फरार झाले की ते पुन्हा सापडणार नाहीत, अशी याचिका तिने न्यायालयात दाखल (Petition in Court) केली आहे. या याचिकेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केतकी चितळेवर अगोदरच अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे.

Actress Ketki Chitale
अभिनेत्री केतकी चितळे

By

Published : Jun 7, 2022, 3:43 PM IST

नवी मुंबई :अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.केतकीने राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री यांना जामीन देऊ नये, त्यांना जामीन दिल्यास ते फरार होतील फरार झाले की ते पुन्हा सापडणार नाहीत, अशी याचिका तिने न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे तिच्या याचिकेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिच्यावर सध्या अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे.

अनिल देशमुखांच्या जामिनाला केतकी चितळेचा विरोध : राज्यसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावण्याची जामीन अर्ज केला आहे. पण, त्यांच्या या जामिनाला आता अभिनेत्री केतकी चितळेनं विरोध केला आहे. न्यायालयात वकिलांमार्फत केतकीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. केतकीच्या याचिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अनिल देशमुख प्रकरण काय आहे पाहूयात : 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अनिल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दिवसाचा जामीन अर्ज केला आहे. या अनिल देशमुखांच्या या जामीन अर्जाला केतकी चितळेनं विरोध केला असून, अनिल देशमुख यांना जामीन देऊ नये. देशमुखांना जामीन दिल्यास ते फरार होतील फरार झाले की ते पुन्हा सापडणार नाहीत. केतकी चितळेवर अगोदरच ठाणे पोलिसांत अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा : Ketki Chitale Controversy : केतकी चितळेला पुढचे काही दिवस करावा लागणार कोर्ट-कचेरीचा सामना?

ABOUT THE AUTHOR

...view details