महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांचे पीए, पीएस आणि सचिन वाझेंची सीबीआय करणार पुन्हा चौकशी - अनिल देशमुख 100 कोटी प्रकरण

शंभर कोटी प्रकरणात संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांची सीबीआय चौकशी करणार आहे. याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली ( Cbi Reinvestigate Sachin Waze ) आहे.

Anil Deshmukh Case
Anil Deshmukh Case

By

Published : Feb 14, 2022, 7:55 PM IST

Updated : Feb 15, 2022, 8:33 AM IST

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी ( Anil Deshmukh Money Laundering Case ) त्यांचे पीएस संजीव पालांडे आणि पीए कुंदन शिंदे यांची चौकशी सीबीआयने केली ( Cbi Reinvestigate Sanjiv Palande ) होती. आता पुन्हा सीबीआयने शिंदे, पालांडे आणि सचिन वाझे यांच्या चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायलायत अर्ज दाखल केला ( Cbi Reinvestigate Sachin Waze ) होता. तो अर्ज मुंबई न्यायालयाने मंजुर केला आहे.

संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांची यापुर्वी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र, अधिक चौकशीसाठी सीबीआयने मुंबई न्यायालयाच्या NIA न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी देत सचिन वाझे याची 15 आणि 16 फेब्रुवारी तर, संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांची 16 आणि 17 फेब्रुवारी असे दोन दिवस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणी चौकशी सुरु केली असता, संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक केली होती. तसेच, याप्रकरणाचा चौकशी अहवाल लिक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती. ते दोन्ही आरोपी जामीनावर सध्या बाहेर आहेत. मात्र, या सर्व चौकशीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा -Congress Protest Against Modi : फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन मागे, पटोले म्हणाले, "मोदींनी महाराष्ट्राची..."

Last Updated : Feb 15, 2022, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details