मुंबई - मुंबईमध्ये वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. 0फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागले आहेत. काल १८ मार्चला वर्षभरातील सर्वाधिक २८७७ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १७ मार्चपर्यंत १६ हजार ७५१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागापैकी अंधेरी पश्चिम येथे सर्वाधिक म्हणजेच १६३५ सक्रिय रुग्ण आहेत. तर बोरिवली, अंधेरी पूर्व, कांदिवली, मुलुंडमध्ये प्रत्येकी एक हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण असल्याने हे विभाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. १२ विभागात ५०० हुन अधिक सक्रिय रुग्ण आहेत. ६ विभागात ५०० हुन कमी सक्रिय रुग्ण आहेत.
दीड महिन्यात १३ हजार सक्रिय रुग्ण वाढले -
मुंबईत गेल्या (2020) मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याआधी मुंबईत गेल्यावर्षी ७ ऑक्टोबरला २८४८ तर ८ ऑक्टोबरला २८२३ रुग्णांची नोंद झाली होती. काल १८ मार्चला वर्षभरातील सर्वाधिक २८७७ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ फेब्रुवारीला ५६५६ सक्रिय रुग्ण होते. २८ फेब्रुवारीला त्यात वाढ होऊन ९७१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. १८ मार्च रोजी सक्रिय रुग्णांचा आकडा १८ हजार ४२४ वर पोहचला आहे. गेल्या दिड महिन्यात सुमारे १३ हजार सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
१ हजाराहून अधिक रुग्ण असलेले विभाग -
अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट येथे १६३५, बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात ११११, कांदिवली आर साऊथ येथे १०३४, अंधेरी पूर्व के ईस्ट येथे १०७४, मुलुंड टी विभाग येथे ११३२ सक्रिय रुग्ण आहेत.
५०० हुन अधिक रुग्ण असलेले विभाग -
मालाड पी नॉर्थ येथे ८७७, घाटकोपर एन विभाग येथे ९०२, भांडुप एस विभाग येथे ८५०, दादर जी नॉर्थ येथे ५४०, ग्रॅंटरोड डी विभाग येथे ६५७, गोरेगाव पी साऊथ येथे ८११, माटुंगा एफ नॉर्थ येथे ८१९, कुर्ला एल विभाग येथे ७०६, बांद्रा एच वेस्ट ७६८, खार एच ईस्ट येथे ५३९, चेंबूर एम वेस्ट येथे ७५५, मानखुर्द गोवंडी एम ईस्ट येथे ५९६ सक्रिय रुग्ण आहेत.
५०० हुन कमी रुग्ण असलेले विभाग -