मुंबई -लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली मुंबईची लोकल आता 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. त्यामुळे लोकल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईतील एका प्रवाशाने चक्क रेल्वेत बसण्यापूर्वी लोकलच्या दारावर डोके टेकवत आपल्या लाईफलाईनसमोर नतमस्तक झाला. हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांना भावला असून, त्यांनी तो फोटो ट्विट केला आहे.
हेही वाचा -मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फसवा, भाजपची टीका
लाईफलाईनसमोर प्रवासी नतमस्तक
लोकलची ओळख मुंबईकरांची लाईफलाईन अशी आहे. या लोकल रेल्वेसोबत मुंबईकरांच एक वेगळेच भावनिक नाते आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा १ फेब्रुवारीला सुरू झाली. यावेळी एका प्रवाशाने लोकलच्या दारावर डोके टेकवत नतमस्तक झाला. लोकलसमोर नतमस्तक झालेल्या प्रवाशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.