मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटर ( Anand Mahindra Active On Twitter ) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. येथे नेहमीच हटके अंदाज असलेल्या विविध गाड्यांचे व्हिडीओ शेयर करतात किंवा अनेकांनी अनेकांनी शेयर केलेल्या व्हिडीओचे कौतुक करतात. असाच एक हटके व्हिडीओ 'रोड्स ऑफ व्हिडीओ' ( Roads Of Mumbai ) या ट्विटर अकाउंटवरून शेयर करण्यात आला होता. या व्हिडीओत एका दूध विक्रेत्याची जुगाडू एफ 1 कार पाहून ( Anand Mahindra Reply To Milk Seller Video ) उद्योगपती आनंद महिंद्रा चांगलेच प्रभावीत झाले आहेत. त्यांनी ही गाडी बनवणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्हिडीओ बघून आनंद महिंद्रा प्रभावित - ट्विटरवर 'रोड्स ऑफ व्हिडीओ' या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका दुधवाल्याने एफ 1 कारसारखी दिसणारी गाडी तयार केली आहे. ही गाडी चालवत तो दूध विकतान दिसतो आहे. हा व्हिडीओ बघून उद्योगपती आनंद महिंद्रा चांगलेच प्रभावीत झाले आहेत. हे वाहन रस्त्याच्या नियमांची पूर्तता करते की नाही, याबद्दल मला खात्री नाही. मी बऱ्याच काळापासून पाहिलेली ही सर्वात छान गोष्ट आहे. मला या रोड योद्ध्याला भेटायचं आहे, असे ट्विट आनंद महिंद्रांनी केलं आहे.