मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या समवन्य समितीची महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. राज्यसमोर असलेल्या महत्वाच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक, महत्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा - MVA government
आज सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडीच्या समनव्य समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अशोक चव्हाण, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरत, एकनाथ शिंदे, जयंत पाटील राहणार उपस्थित राहणार आहेत. बैठकीतुन महाविकास आघाडी सरकार समोर असलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
आज सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडीच्या समनव्य समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अशोक चव्हाण, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरत, एकनाथ शिंदे, जयंत पाटील राहणार उपस्थित राहणार आहेत. बैठकीतुन महाविकास आघाडी सरकार समोर असलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. खासकरून सध्या राज्यसरकार समोर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीच्या आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न उभा आहे. या आरक्षणाचा बद्दल न्यायालयीन लढाई सुरू असली तरी राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मुद्यावर आंदोनचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून आरक्षणाच्या मुद्यावर राज्यसरकरला धारेवर धरण्याचे काम सुरू आहे. या बाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
तसेच राज्याचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासून सुरू होणार आहे. याबाबत आज 22 जुलैला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. त्यामाध्यमातून अधिवेशन किती दिवसांचे असणार आहे हे ठरवण्यात येईल. मात्र आशिवेशनाला विरोधकांचा सूर ओळखून त्या वाटत रणनीती आखण्याचे काम देखील आजच्या समवन्य समितीच्या बैठकीतून करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सोबतच महाविकास आघाडी सरकार म्हणून तिन्ही पक्षांच्या भूमिकेवर देखील चर्चा होणार आहे.