मुंबई -अभिनेत्री कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. अभिनेत्री कंगना रणौत 'नॉटी गर्ल' आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केले होते. तसेच 'हरामखोर' म्हणजे मराठी भाषेत 'बेईमान' होतो. कंगना नॉटी म्हणजेच खट्याळ आणि बेईमान मुलगी आहे, असे वक्तव्य त्यांनी काल केले होते. संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे.
'संजय राऊत आम्ही विचार केला, त्यापेक्षा जास्तच नॉटी' - अमृता फडणवीस ट्विट
नॉटी', या शब्दाचा आधार घेत आम्ही विचार केला त्याहून ते जास्तच नॉटी आहेत. नॉटी नॉटी, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंगनाच्या पोस्टरला चपलांनी मारण्याच्या कृत्याचा त्यांनी ट्विट करून निषेध केला होता.
काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली होती. आता पुन्हा एकदा या वक्तव्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नॉटी', या शब्दाचा आधार घेत आम्ही विचार केला त्याहून ते जास्तच नॉटी आहेत. नॉटी नॉटी, असं ट्विट अमृता यांनी केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंगनाच्या पोस्टरला चपलांनी मारण्याच्या कृत्याचा त्यांनी निषेध केला होता.