मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. या पत्रामुळे एकच खळबळ माजली. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपामुळे विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं, असा सवाल भाई जगताप यांनी फडणवीस यांना विचारला.
यावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. भाई जगताप यांनी केलेली टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. अमृता फडणवीस यांनी आक्रमक होत एकेरी भाषेत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे.