मुंबई - कोविड रुग्णालय, तेथील बेडची संख्या आदींची माहिती नागरिकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती एका अॅपच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ही मागणी मान्य करावी, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
अमित ठाकरेंच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा - बाळा नांदगावकर - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
कोविड 19चा प्रादुर्भाव वाढत असताना ज्या उपाययोजना शासनाकडून केल्या जातात, त्यावर काय करावं याची लोकांना माहिती मिळत नाही. कोरोना रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची संख्या याची माहिती दरदिवशी नागरिकांना मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून नागरिकांना समन्वय साधण्यास त्रास होणार नाही आणि सरकारलादेखील उपाययोजना करण्यास उपयुक्त ठरेल, असे नांदगावकर यांनी म्हटले.

अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यावर प्रथमच त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पक्षाच्यावतीने अधिकृत पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरे म्हणतात, की राज्य सरकारने कोविडसाठी हेल्पलाईन सुरू केल्याची मला कल्पना आहे. तरीही नागरिकांना आजार झाल्यावर काय करावे हे कळतं नाही. याबाबत मनसेकडे नागरिकांच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. अशावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती अतिशय बिकट असते. अशात उपचारादरम्यान नागरिकांना बेड उपलब्ध नाही, दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगितले जाते. त्यामुळे अशावेळी तंत्रज्ञानाचा वापर करून कोविड 19 व रुग्णालयाची माहिती असलेले अॅप विकसित करावे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.