मुंबई - राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडून एका संस्थेने बोगस पीएचडीचे वाटप करून घेतले असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena MLA Manisha Kayande Allegations ) यांनी केला आहे. काल 21 मार्च रोजी राजभवनात झालेला कार्यक्रमात एका संस्थेने बोगस पीएचडी डिग्रीचे वाटप केले असल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला. याबाबत अधिक चौकशीचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ( Uday Samant orders to investigate matter) दिले आहेत. राज्यपाल यांना अंधारात ठेऊन एखाद्या संस्थेने असे कृत्य केले आहे का ? याबाबत राज्यपाल कार्यालयाशी संपर्क केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
उदय सामंतांनी दिले चौकशीचे आदेश -