महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ED ON ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप हत्या आणि दहशतवादासारखेचं, ईडीच्यावतीने अनिल सिंग यांचा न्यायालयात युक्तीवाद - अनिल देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ED ON ANIL DESHMUKH) यांच्या जामीन अर्जावर ईडीने युक्तिवाद पूर्ण केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग (anil singh) यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप (allegations of financial misappropriation) हत्या आणि दहशतवादासारखेचं असल्याचं सिंग यांनी आपल्या युक्तीवादादरम्यान म्हटलं.

ED ON ANIL DESHMUKH
अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप हत्या आणि दहशतवादासारखेचं, ईडीच्या वतीने अनिल सिंग यांचा न्यायालयात युक्तीवाद

By

Published : Sep 28, 2022, 7:12 PM IST

मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ED ON ANIL DESHMUKH) यांच्या जामीन अर्जावर ईडीने युक्तिवाद पूर्ण केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग (anil singh) यांनी हा युक्तिवाद केला. आर्थिक गैरव्यवहार हा अत्यंत गंभीर प्रकारचा गुन्हा असून, अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप (allegations of financial misappropriation) हत्या आणि दहशतवादासारखेचं असल्याचं सिंग यांनी आपल्या युक्तीवादादरम्यान म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay high court) न्यायमूर्ती एन.जी जमादार यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. निर्णय राखीव ठेवला आहे.

जामीन नकोच- अनिल देशमुखांनी केलेला जामीन अर्ज (Bail application) हा वैद्यकीय जामीन अर्ज नसल्यामुळे देशमुखांच्यावतीने उपस्थित केला जाणारा वैद्यकीय जामीनाचा मुद्दा चुकीचा आहे. अनिल देशमुखांना वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रासलेले आहे. या व्यतिरिक्त कुठलाही गंभीर आजार अनिल देशमुख यांना नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय जामीन देखील मंजूर करू नये. असं ईडीने युक्तिवादात म्हटले आहे.

वाझेच्या साक्षी संदर्भात संशय: या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या (Sachin Waze) साक्षसंदर्भात अनेक प्रश्न आणि संशय व्यक्त केला जाऊ शकतो असा युक्तीवाद अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, कोणती साक्ष कितपत खरी आहे हे ठरवण्याचा अधिकार ट्रायल कोर्टाला आहे. ज्यावेळी या प्रकरणातील ट्रायल सुरू होईल. त्यावेळी संबंधित ट्रायल कोर्ट या संदर्भातील निर्णय घेईल असे देखील अनिल सिंग यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश :अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला निर्देश दिलेले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी एका खंडपीठाकाडून दुसऱ्या खंडापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. सुरुवातील एका न्यायमूर्तींनी याबाबतची सुनावणी ऐकली होती. यामध्ये केवळ तपास यंत्रणेचा युक्तिवाद बाकी होता. त्याचवेळी हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. मात्र, ज्या न्यायमूर्तींकडे हे प्रकरण गेले होते. त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण? मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह तसेच पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी (100 crore extortion case) गोळा करण्यास सांगितली असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली आणि अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. सध्या देशमुख आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details