मुंबई - भाजप आणि शिवसेनेने अतिरिक्त उमेदवार उतरवल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी भाजप शिवसेनेकडून ( Shiv Sena MLA in Hotel Retreat news Mumbai ) हालचालींना वेग आला आहे. मतांची जुळवाजुळव सुरू असून पक्षांतर्गत मते इतरत्र वळू नये यासाठी काळजी घेतली जाते आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या ( Shiv Sena MLA in Hotel Retreat news Mumbai ) आमदारांना मुंबईतील मालाड येथील रिट्रीट ( Hotel Retreat news Mumbai ) या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि काही अपक्ष आमदारांची वर्षा बंगल्यावर ( Rajya sabha elections Shiv Sena MLA ) बैठकही घेतली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये हलवले - हॉटेल रिट्रीट शिवसेना आमदार
आपला उमेदवार निवडून यावा यासाठी भाजप शिवसेनेकडून ( Shiv Sena MLA in Hotel Retreat news Mumbai ) हालचालींना वेग आला आहे. मतांची जुळवाजुळव सुरू असून पक्षा अंतर्गत मते इतरत्र वळू नये यासाठी काळजी घेतली जाते आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या ( Shiv Sena MLA in Hotel Retreat news Mumbai ) आमदारांना मुंबईतील मालाड येथील रिट्रीट ( Hotel Retreat news Mumbai ) या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि काही अपक्ष आमदारांची वर्षा बंगल्यावर ( Rajya sabha elections Shiv Sena MLA ) बैठकही घेतली.
काल रात्री बैठक झाल्यानंतर सर्व आमदारांना एका बसने हॉटेल रिट्रीटमध्ये आणण्यात आले. आज मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या छोट्या पक्षांच्या आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याची शक्यता आहे.
कालच्या बैठकीला ६५ आमदार पोहोचल्याचा दावा शिवसेनेने केला असून, त्यात शिवसेनेचे ५५ आणि १० अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांची संख्या ५० पेक्षा कमी असली तरी उर्वरित आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीसह अन्य छोटे पक्षही बैठकीला आले नाहीत, ही शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. बैठकीनंतर अपक्ष आणि शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगितले. रणनीतीचा भाग म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.
हेही वाचा -जनतेच्या सुखासाठी मंत्री जयंत पाटील केदारनाथाच्या दर्शनाला