मुंबई -मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची ( Police Commissioner Sanjay Pande ) नियुक्ती झाल्यापासून संजय पांडे यांनी वेगवेगळे घोषणा केल्या. प्रथम त्यांनी मुंबईकरांची संवाद साधत मुंबईकरांचा विश्वास पोलीस खात्यावर पुन्हा घट्ट व्हावा, याकरिता प्रयत्न केला होता. तसेच काही समस्या असल्यास थेट त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता जाहीर केला होता. आज पुन्हा संजय पांडे यांनी पुन्हा एक मोठी घोषणा केली असून कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील नाईट ड्युटी ( Police Officer Night Duty ) करण्यास सांगण्यात आले आहे.
संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे नियमांची घोषणा केली. तसेच त्यांच्या सुविधासाठीदेखील संजय पांडे यांनी मागील रविवारपासून संडेस्ट्रीट नावाने नवीन उपक्रम सुरू केला होता. त्या उपक्रमाला मुंबईकराने उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला होता. मुंबईतील मैदानेमधील गर्दीमुळे अनेक मुंबईकरांना बाहेर मन मोकळं खेळण्यासाठी पण जाता येत नाही. त्यामुळे संजय पांडे यांनी मुंबईतील 13 रस्त्यांवर संडेस्ट्रीट नावाने नवीन उपक्रम सुरु केला होता. त्यामध्ये सायकलिंग, कबड्डी यासारखे विविध खेळ मुंबईकर खेळताना दिसले आहे.