मुंबईकोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाने मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्य सरकारने देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, न्यायालयीन कामकाज असलेले मुंबई उच्च न्यायालय सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे आज मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्राचे कोर्ट सुरू आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व न्यायालय आज सुरू - मुंबई दहिहंडी बातमी
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील कोर्टाला सुट्टी जाहीर न केल्याने आज सर्वच कोर्टांमध्ये कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे मात्र एकीकडे दहीहंडीचे संदर्भात पोलिसांना लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू असल्याने त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असतो. त्यामुळे पोलिसांवर दुहेरी पोलीस बंदोबस्त लावावा लागत आहे.
शिंदे सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीरदहीहंडी उत्सव हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात असतो. तसेच मुंबई मोठमोठ्या थरांची परंपरा देखील आहे. मुंबईतील दहीहंडी पाहण्याकरिता मुंबई परिसरात महाराष्ट्रातील जिल्ह्यातून देखील लोक मुंबई ठाणे मधील दहीहंडी पाहायला येत असतात. यावेळी शिंदे सरकारने सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष दहीहंडी बंद होती. त्यानंतर कुठल्याही नियम नसताना यावर्षी दहीहंडी साजरी करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात गोविंदांमध्ये उत्साह देखील पाहायला मिळत आहेत.
पोलिसांवर दुहेरी पोलीस बंदोबस्ताचा ताण मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील कोर्टाला सुट्टी जाहीर न केल्याने आज सर्वच कोर्टांमध्ये कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे मात्र एकीकडे दहीहंडीचे संदर्भात पोलिसांना लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू असल्याने त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असतो. त्यामुळे पोलिसांवर दुहेरी पोलीस बंदोबस्त लावावा लागत आहे.