महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री, अशी आहे वळसे-पाटलांची कारकिर्द - ncp

30 ऑक्टोबर 1956 रोजी पुण्यातील आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटील यांचा जन्म झाला. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असल्याने घरातच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून विधी शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी घेतले.

जाणून घ्या दिलीप वळसे-पाटील यांच्याविषयी सर्वकाही
जाणून घ्या दिलीप वळसे-पाटील यांच्याविषयी सर्वकाही

By

Published : Apr 5, 2021, 4:32 PM IST

Updated : Apr 5, 2021, 4:47 PM IST

मुंबई :अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्या कारकीर्दीचा हा थोडक्यात आढावा..

दिलीप वळसे-पाटील यांची कारकीर्द

कुटुंबातूनच राजकारणाचे बाळकडू

30 ऑक्टोबर 1956 रोजी पुण्यातील आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटील यांचा जन्म झाला. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असल्याने घरातच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून विधी शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी घेतले. एलएलबी आणि एलएलएमची पदवी वळसे-पाटील यांनी घेतलेली आहे.

पवारांचे स्वीय सहायक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरूवात

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. पवार यांचे स्वीय सहायक म्हणून काम करताना राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील ओळखले जाऊ लागले. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे घेतले.

आंबेगावचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व

जनता दलाच्या किसनराव बाणखेले यांचा आंबेगाव तालुक्‍यावर चांगला प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी मोठा विजय मिळविला. तेव्हापासून ते आतापर्यंत सलग सात वेळा ते आंबेगावमधून निवडून आले आहेत.

आघाडी सरकारमध्ये अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी

महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना विधानसभेत त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. तर आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, अर्थ व नियोजन अशा खात्यांची जाबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. २००९ ते २०१४ दरम्यान ते विधानसभेचे सभापतीही राहिले.

शिक्षण क्षेत्रातील अमूलाग्र बदलांमध्ये महत्वाची भूमिका

आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय खात्याचे मंत्रिपद सांभाळताना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्वाचे बदल त्यांनी केले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यतेची प्रक्रियाही अधिक सुरळीत करण्यासाठीचे निर्णय त्यांनी घेतले. राज्यभरात एमएस-सीआयटी या संगणकविषयक मुलभूत शिक्षणाच्या कोर्सेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलच्या स्थापनेत वळसे-पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

उल्लेखनीय कामगिरी

माळीण गावात दुर्दैवी झालेल्या घटनेनंतर आपत्ती निवारणापासून ते पुनर्वसनापर्यंत स्वतः लक्ष त्यांनी घातले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी काम करत असताना साखर उद्योग व शेतकऱ्यांसाठी देशपातळीवरही त्यांनी काम केले आहे.

Last Updated : Apr 5, 2021, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details