मुंबई - राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर ही भेट होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी असलेली पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अजित पवार आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यात अजित पवार यांनी आढावा घेतला. या आढाव्यात असलेली अतिवृष्टी भागातली परिस्थिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर अजित पवार या बैठकीत ठेवतील. तसेच अजित पवार यांनी दौऱ्या दरम्यान बाधित शेतकऱ्यांना त्वरित 75 हजार रुपयांची मदत करण्यासंदर्भात देखील मागणी केली होती. त्यामुळे या बैठकीत पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडून ही मागणी केली जाईल.
ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी लिहिले पत्र -गेल्या आठवड्यात अजित पवार मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मध्ये अतिवृष्टी पाहण्याचा दौरा पार पडला आहे. मात्र, या दौर्याआधी अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी अजित पवार पुन्हा या बैठकीत करू शकतील.
शेतकऱ्यांकडे लक्ष द्या; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका -राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात दंग आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. उघड्यावर शेतकऱ्यांचा संसार (To save the lives of farmers in the state)आलेला असून मुख्यमंत्र्यांनी (CM) तात्काळ तिकडे लक्ष द्यावे. अशी मागणी करणारे पत्र (Ajit Pawar will give a letter) देणार असल्याचे, पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता.