महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी ‘सल्ल्या’ऐवजी स्पष्ट निर्देश द्यावेत - अजित पवार - ajit pawar on shaktikant das

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे.

ajit-pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Mar 27, 2020, 11:51 PM IST

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे. मात्र, देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी लॉक डाऊन आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझर्व्ह बँकेकडून हे निर्णय अपेक्षित होते, असे पवार म्हणाले. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याने कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

बँकांचा सीआरआर कमी करून ३ टक्क्यांवर आणल्याने बाजारात पावणे चार लाख कोटी रूपये उपलब्ध होतील आणि याचा बँकांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

परंतु, राष्ट्रीय, खासगी, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांनी त्यांची कर्जवसुली तीन महिने थांबवण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details