महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar : चित्त्याचे सोडा, वेदांताचे काय झाले ते सांगा? अजित पवार यांचा भाजपला टोला - PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबिया देशामध्ये चित्ता आणण्यात आले. चित्ता देशात आणणे ही जरी चांगली बाब असली तरी, त्याने काही महत्त्वाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे चित्ताचा सोडा आधी वेदांता प्रकल्प राज्यातून बाहेर का गेला ? हे सांगा असा टोला विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भारतीय जनता पक्षाला लावला आहे. ( Ajit Pawars Taunt To Bharatiya Janata Party )

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Sep 20, 2022, 4:24 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबिया देशामध्ये चित्ता आणण्यात आले. याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र यातून काही महत्त्वाचे प्रश्न सुटणार आहेत का? सध्या देशासमोर महागाई, बेरोजगारी यासारखे असंख्य मोठे प्रश्न आहेत. चित्ता देशात आणणे ही जरी चांगली बाब असली तरी, त्याने काही महत्त्वाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे चित्ताचा सोडा आधी वेदांता प्रकल्प राज्यातून बाहेर का गेला ? हे सांगा असा टोला विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार( Ajit Pawar ) यांनी भारतीय जनता पक्षाला लावला आहे. देशातील बेरोजगारी महागाई यासारखे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला काढण्यासाठी असे मुद्दे समोर आणले जातात असा चिमटा ही अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षाला काढला आहे. ( Vedanta Ajit Pawars Taunt To Bharatiya Janata Party )

चित्ताचा सोडा, वेदांताचे काय झाले ते सांगा? अजित पवार यांचा भारतीय जनता पक्षाला टोला




भाजप दोन खासदारांचा पक्ष होता -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातत्याने अडीच जिल्ह्यातील पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडून हिणवले जाते. काही दिवसापूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काढला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, निंदकाचे घर नेहमीच शेजारी असावे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या वक्तव्याकडे आपण अधिक लक्ष देत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असे हिनवताना सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे केवळ दोनच खासदार होते. याची आठवणही अजित पवारांनी भाजपला करून दिली आहे.




अर्थमंत्र्यांचे बारामतीत स्वागत आहे -मिशन 45 अंतर्गत भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे दिली आहे. पुढच्या महिन्यात अर्थमंत्री बारामतीचा दौरा करणार असून अर्थमंत्र्यांचं बारामती मध्ये स्वागत आहे असे वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केले. आपल्या देशात लोकशाही असून कोणीही कोठेही जाऊ शकते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकतो त्यामुळे अर्थमंत्री जर बारामती मध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे यावेळी म्हटले आहे.



पत्राचा प्रकरणात कोर्टाचा निर्णय येईल -शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने काल सत्र न्यायालयात ॲडिशनल चार्जशीट दाखल केली. यामध्ये पात्र चाळ प्रकरणांमध्ये शरद पवार हे देखील एका बैठकीला उपस्थित असल्याचा उल्लेख करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता हे सर्व प्रकरण कोर्टात आहे. तसेच या सर्व प्रकरणात वकिलांकडून बाजू मांडली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय निर्णय घेईल असे स्पष्टीकरण अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details