मुंबई -राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण ( Ajit Pawar infected by corona virus) झाली आहे. ट्विट करत त्यांनी त्याबाबतची माहिती दिली. रविवारी त्यांनी कोरोनाची चाचणी ( corona test ) केली. त्याचा रिपोर्ट नुकताच मिळाला, ज्यात ते कोरोनाबाधीत झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संबंधीत आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. तसच लक्षणं दिसल्यास चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांचे ट्विट -कोरोनाबाधीत झाल्याची माहिती अजित पवार यांनीट्विटच्या माध्यमातून दिली. " काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी." असं अजित पवार यांनी सर्वांना खबरदारी म्हणून सांगितले आहे.