महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव; मुंबईत 100 कोटी खर्चून मराठी भवन बांधण्यात येणार - Marathi Bhasha Bhavn

प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामची माहिती राबविण्यासाठी मराठवाड्यात गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर ( Maharashtra Budget 2022 ) केले आहे.

मराठी भाषा संवर्धन
मराठी भाषा संवर्धन

By

Published : Mar 11, 2022, 3:17 PM IST

Updated : Mar 11, 2022, 4:54 PM IST

मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पातील भाग एक सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी ( Ajit Pawar announcements on cultural developments ) मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी ( Book village scheme in Maharashtra ) केली आहे.

  • मुंबईत 100 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र भवन ( Maharashtra Bhavan ) राबविण्यात येईल. मुंबईत काही कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मराठी भाषा संशोधन केंद्रासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात ( Marathi research center ) येणार आहे.
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामची माहिती राबविण्यासाठी मराठवाड्यात गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
Last Updated : Mar 11, 2022, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details