मुंबई - गोरेगाव - मुलुंड लिंक रोडवरील रूणवाल ग्रीन समोर सुरू असलेल्या नाला बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान अजगर दिसला. या अजगराची लांबी 8 फूट होती. त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजगराला प्राणिमित्रांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहे.
मुलुंडमध्ये नाला बांधकामाच्या ठिकाणी आढळला अजगर; प्राणिमित्रांनी केली सुटका
नाला बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना 8 फुट लांबीचा अजगर दिसला. अजगराला प्राणिमित्रांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहे.
गोरेगाव-मुलुंड रोडवर नाली बांधकाम सुरू आहे. कामगारांना त्या ठिकाणी अचानक अजगर निदर्शनास आला. या अजगराची लांबी जवळपास 8 फुट इतकी होती. कामगारांनी तात्काळ प्लांट अँड अॅनिमल वेलफेयर सोसायटी, मुंबई आणि अम्मा केयर फाऊंडेशनच्या सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच काही सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्रांनी अजगराला जीवदान देत सुखरुप ताब्यात घेतले. त्यानंतर वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. पशू चिकित्सकांनी अजगराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. अम्मा फाऊंडेशनचे कार्यकर्ते निशा कुंजू, हितेश यादव आणि सुष्मा दिघे यांनी अजगराला जीवदान दिले.