महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 28, 2019, 12:32 PM IST

Updated : Sep 28, 2019, 1:04 PM IST

ETV Bharat / city

रुबिक्स क्यूब वर ए ते झेड अक्षर काढणारा आफान कुट्टी

आफान कुट्टी हा डोळ्यावर पट्टी बांधून क्यूबवर इंग्रजीतील अक्षरे साकारतोय. एक वर्षातच तो रुबिक्स क्यूबवर लिलया पद्धतीने ए ते झेड अक्षर काढत आहे.

आफान कुट्टी

मुंबई -रुबिक्स क्यूबवर इंग्रजीमधील ए ते झेड ही अक्षरे काढून विश्व विक्रमाच्या प्रयत्नासाठी मुंबईतील दाभान कुट्टी हा 14 वर्षाचा मुलगा प्रयत्न करत आहे. भारतीयांसाठी नवा असलेल्या रुबिक्स क्यूब या खेळामध्ये आफाण कुट्टी हा डोळ्यावर पट्टी लावून इंग्रजीतील येथे झेड अशी अक्षरे कमीत कमी वेळामध्ये क्यूबवर साकारतोय.

आफान कुट्टी

मुंबईतील आपण कुट्टी हा विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेला होता, त्याला मोबाईलचे व्यसन इतके चढले होते की त्याचा त्रास डोळ्याला होऊ लागला. तो मोबाईल मधून बाहेर यायला तयारच नव्हता. त्यामुळे डोळ्या सोबतच त्याच्या तब्येतीवर देखील परिणाम झाला. मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला मोबाईल मधून कसे बाहेर काढावे या विचारात असलेल्या त्यांच्या पालकांनी अफान कुट्टी याच्या हातात रुबिक क्यूब दिला. एका वर्षापर्यंत आफान याला क्यूब बद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र एक वर्षातच तो रुबिक्स क्यूबवर लिलया पद्धतीने ए ते झेड अक्षर काढत आहे.

विशेष बाब म्हणजे आफान कुट्टी हा डोळ्यावर पट्टी बांधून क्यूबवर इंग्रजीतील अक्षरे साकारतोय. रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून विविध शब्द साकारल्याने आफान कुट्टी याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली आहे. त्याच्या पराक्रमामुळे वयाच्या तेराव्या वर्षी आपण कुट्टी याला डॉक्टरेट देखील मिळाली आहे. रुबिक्स क्यूब या खेळामध्ये आफान हा आता पारंगत झाला आहे. कमी कालावधीमध्ये ए ते झेड ही अक्षरं क्यूबवर साकारण्यासाठी आणि त्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी तो सध्या प्रयत्न करत आहे.

Last Updated : Sep 28, 2019, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details