महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का ? याचा विचार करावा - आदित्य ठाकरे - free education

पालिकेत शिक्षण विभागात आधीपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतरही आणखी काही बदल हवे असल्यास त्यात बदल केले जातील. या वर्षापासून पालिकेच्या शिक्षणाबाबत नॅबिट या संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. एक महिन्यात आढावा घेऊन कुठे कमी पडलो याचा आढावा घेतला जाईल.

आदित्य ठाकरेंनी घेतला पालिकेत आढावा

By

Published : Jun 11, 2019, 4:41 PM IST

मुंबई - महापालिकेच्या शाळांचा इयत्ता दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. यावर बोलताना विद्यार्थ्यांना देण्यात येणारे २० ग्रेस मार्क काढून टाकल्याने दहावीच्या निकालावर परिणाम झाला, असा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. निकालावर परिणाम झाल्याने संपूर्ण शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार करावा लागेल असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

आदित्य ठाकरेंनी घेतला पालिकेत आढावा

मुंबई महानगरपालिकेत वेळोवेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून विविध विभागांचा आढावा घेतला जातो. आज आदित्य ठाकरे यांनी शिक्षण आणि आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालिकेत शिक्षण विभागात आधीपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतरही आणखी काही बदल हवे असल्यास त्यात बदल केले जातील. या वर्षापासून पालिकेच्या शिक्षणाबाबत नॅबिट या संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. एक महिन्यात आढावा घेऊन कुठे कमी पडलो याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर जो काय बदल करायचा तो बदल केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

प्रवेशासाठी रांगा लागलाय हव्यात -
मुंबई महापालिकेकडून शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना टॅब आणि शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. नुकतेच १८ शाळांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून १४ शाळांच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. आम्ही पालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर देत असल्याने पालिकेच्या शाळांबाहेर प्रवेशासाठी रांगा लागायला हव्यात, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

जास्त ठिकाणी पाणी तुंबणार नाही -
पावसाळ्याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु आहेत. मुंबईत जास्त ठिकाणी पाणी तुंबणार तुंबणार नाही, मात्र ज्या ठकाणी पाणी तुंबणार आहे, अशा ठिकाणी पंप लावण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्याबाबत आढावा घेतला असून, पावसाळयात रुग्णालयांमध्ये औषधे कमी पडणार नाहीत, अशी शाश्वती ठाकरे यांनी दिली.

दुष्काळ आणि पावसाळ्यावर काम करायला आवडेल -
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. याबाबत विचारले असता अशी चर्चा सुरु आहे. निवडणुकीला अद्याप तीन महिन्याचा कालावधी आहे. सध्या राज्यात दुष्काळाचा प्रश्न मोठा आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे सध्या दुष्काळ आणि पावसाळा हे दोन विषय आहेत. त्यावर काम करायला आवडेल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details