मुंबई - राज्यसभेच्या ( Rajya Sabha Election ) निवडणुकीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक ( Maha vikas aghadi mla trident hotel ) राहिला आहे. भाजपला फायदा होऊ नये यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आज रात्रभर हॉटेल ट्रायडेंटमध्ये ( Aditya Thackeray and Sanjay Raut at Tridentdent hotel ) तळ ठोकणार आहेत.
हेही वाचा -Sanjay Raut lashes out at BJP : 'विरोधकांची बुबुळ बाहेर आली असतील' संजय राऊतांची भाजपवर घणाघाती टीका
राज्यसभेची निवडणूक शुक्रवारी सकाळपासून सुरू होईल. या निवडणुकीत शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक आणि भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एकूण सहा जागांसाठी निवडणूक होणार असली तरी एकूण सात उमेदवार लढवणार अहेत. एकूण पाच जागा सहज निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांवर या जागेची मदार असणार आहे. या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू आहेत.
आमदार नजरकैदेत -ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, फडणवीस तिसऱ्या उमेदवारावर ठाम राहिल्याने ही निवडणूक होत आहे. आघाडीकडे 169 चे संख्याबळ असले तरी गेल्या अडीच वर्षांत सरकारने आमदारांची नाराजी ओढवून घेतली आहे. ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात निवडणुकीला काही तासांचा अवधी शिल्लक आहे. मते फुटू नयेत यासाठी सत्ताधारी पक्षाने आमदारांना नजर कैदेत ठेवले आहे.
शेलार यांची एन्ट्री आणि गोंधळ - बुधवारी औरंगाबादमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होती. सभेला शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते गेले होते. अशातच रात्री उशिरा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी हॉटेल ट्रायडंटमध्ये एन्ट्री केली. यामुळे गोंधळ उडाला आणि काही काळ वातावरण तंग झाले. दरम्यान, शेलार कोणाला भेटले का? याचा तपास होत आहे.
आदित्य ठाकरे, संजय राऊत ट्रायडेंटला - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी २०१९ चा प्रयोग महाविकास आघाडी राबवत आहे. त्यामुळे हॉटेल ट्रायडेंटमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून ठेवले आहेत. या आमदारांसोबत शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत आजची रात्र काढणार आहेत. दरम्यान, सर्वपक्षीय आमदार, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या आमदारांसोबत बैठक होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीबाबत रणनीती आखली जाणार आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis - देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा होणार सक्रिय