महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ब्रेबॉर्न स्टेडियम कोरोनाग्रस्तांसाठी ताब्यात घ्या'; आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची मागणी फेटाळली - sanjay raut news

शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी वानखडे स्टेडियमवर कोरोना केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. यानंतर ब्रेबॉर्न स्टेडियम देखील ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.

sanjay raut on beborn stadium
'ब्रेबॉर्न स्टेडियम कोरोनाग्रस्तांसाठी ताब्यात घ्या'; आदित्य ठाकरेंनी मागणी संजय राऊत यांची मागणी फेटाळली

By

Published : May 17, 2020, 3:06 PM IST

मुंबई- शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी वानखडे स्टेडियमवर कोरोना केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. यानंतर ब्रेबॉर्न स्टेडियम देखील ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. शहरात 18 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. या सर्वांना रुग्णालयात ठेवणे शक्य नसल्याने पालिकेने कोरोना केअर सेंटर स्थापन केली आहेत. गोरेगाव नेस्को, वरळी एनएसयुआय, बिकेसी या ठिकाणी हे सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे हॉल, सभागृह,मोकळी हॉटेल्स, इमारती, शाळा आदी ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आली आहेत.

मुंबईमधील सुप्रसिद्ध वानखडे स्टेडियमच्या जागेतही कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. तसा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्याचवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ब्रेबॉर्न स्टेडियम ताब्यात घेऊन त्यावर कोरोनाग्रस्तांसाठी सुविधा उभाराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना टॅग केलेल्या एका ट्विटद्वारे राऊत यांनी ही मागणी केली.
संजय राऊत यांनी केलेल्या मागणीला उत्तर देताना हे शक्य नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी त्यांची मागणी फेटाळली. पावसाळ्यात स्टेडियम किंवा मैदानात चिखल होऊ शकतो. यामुळे मैदाने घेणे शक्य नसल्याचे आदित्य यांनी सांगितले.

पावसाळ्यात सुरक्षित असलेल्या जागीच कोरोना केअर सेंटर उभारले जाणे योग्य ठरेल. या आधी आपण अशी सेंटर उभारली असल्याचे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details