मुंबई -बंडखोर आमदारांनी आजारपणाचा फायदा घेत घात केला, अशी जोरदार टीका युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena leader MLA Aditya Thackeray ) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. भायखळा ( Byculla ) येथील शाखा क्र. २१६ ला भेट शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
विश्वास टाकला त्यांनी धोका दिला -एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे. महाराष्ट्रातील सगळे नागरिक उद्धव साहेबांसोबत उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे. त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून, मी असेल किंवा उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात ( Politics ) जागा आहे का? हा प्रश्न आता पडला आहे. आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो, तेव्हा लोक येऊन भेटतात. तेव्हा कळते की मागील दोन- अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला, असे आदित्य ठाकरे यावेळी बोलत होते. देशात लोकशाही महत्त्वाचा प्रश्न हा आहे. ती राहिली आहे का? अशी खंत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकशाही विरोधात पाऊल उचलायला हवा -मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले, तर देशात लोकशाही राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. आमदारांना पळवून घ्यायला लागले, तर देशात लोकशाही जिवंत राहिल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केल अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील, तर त्या गोष्टींकड लक्ष देऊ नये. जे काही घडले ते राज्याने नाही तर संपूर्ण देशाने आणि लोकांनी पाहिले की कसे लोकशाहीच्या विरोधात पावले उचलली गेली पाहिजेत असे आदित्य ठाकरे म्हणाले.