मुंबईस्वातंत्र्य दिनाच्या आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ध्वजारोहण Flag hoisting at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना लाहोटी यांनी आपल्या भाषणामध्ये मध्य रेल्वेने वर्षभरात गाठलेल्या उच्चांकाचा लेखाजोखा मांडला. तसेच जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसात मध्य रेल्वेवर सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याचे संकेतही दिले आहेत. addition local will increased in central railway
मध्य रेल्वेची सर्वश्रेष्ठ कामगिरीयाप्रसंगी बोलताना लाहोटी म्हणाले की मला अतिशय अभिमान आहे की मध्य रेल्वेने सर्व स्तरामध्ये सर्वांगीण सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावली आहे. 2021 22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने 76.16 दशलक्ष टन इतकी मालवाहतूक केली. जी आतापर्यंत कधी साध्य झाली नाही. यावर्षी मध्य रेल्वेने पहिल्या चार महिन्यात 26.77 दशलक्ष टन मान वाहतूक केली. जी आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक आहे. सन 2021 22 मध्ये रुपये 322. 82 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक पार्सल महसूल गाठला आणि एप्रिल ते जुलै 2022 मध्ये रुपये 84.09 कोटींचा महसूल प्राप्त केला. मध्य रेल्वेच्या बिजनेस डेव्हलपमेंट युनिट्सने या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिक वर्ष 2021 22 मध्ये रुपये 40.41 कोटीचा महसूल प्राप्त करून मध्य रेल्वे प्रथम राहिली. अशाच कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात रुपये 18.72 कोटी महसूल प्राप्त झाला आहे.