मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
... यामुळे केली होती याचिका दाखल
अभिनेत्री कंगना रनौत हिचे मुंबईतील खार परिसरात असलेल्या ऑर्किड ब्रीज इमारतीत ३ फ्लॅट होते. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. याविरोधात अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्यानंतर यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला ५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. याबरोबरच अभिनेत्री कंगनाला महानगरपालिकेसोबत संवाद साधून बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करण्याबद्दलचा अर्ज करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधातील याचिका अभिनेत्री कंगनाने घेतली मागे
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर दाखल केलेली याचिका कंगनाने आता मागे घेतली आहे. कोर्टाच्या सूचनेनुसार ही याचिका तिने मागे घेतली आहे.
कंगना रनौत
कोर्टाच्या सूचनेनुसार याचिका घेतली मागे
ही याचिका मागे घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिच्याकडून मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी कायदेशीर अर्ज करण्यात येणार आहे. हा अर्ज कंगणाने केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेला त्यावर ४ आठवड्यात निकाल देणे बंधनकारक असल्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार अभिनेत्री कंगना रनौत हिच्याकडून याचिका मागे घेण्यात आलेली आहे.