महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Grants Bail To Siddharth Pithani : सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठाणीला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) माजी रूम पार्टनर सिद्धार्थ पिठाणी ला (Siddharth Pithani) आज दिनांक 4 जुलै सोमवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court )मोठा दिलासा देत, न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

Siddharth Pithani was granted bail by the High Court
सिद्धार्थ पिठाणीला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

By

Published : Jul 4, 2022, 5:49 PM IST

मुंबई- सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput)आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई एनसीबीने ड्रग्स प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक केली होते. आज मुंबई उच्च (Mumbai High Court) न्यायालयाने अंमली पदार्थ (Drugs )आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट NDPS कायदा अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, सिद्धार्थला गेल्या वर्षी 28 मे रोजी अंमली पदार्थ प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने NCB अटक केली होती. या प्रकरणात सिद्धार्थचे पहिले तीन जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अँडव्होकेट अद्वैत ताम्हणकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या अपीलात पिठाणीचा अवैध अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वतीने विशेष सरकारी वकील श्रीराम सिरसाट यांनी युक्तिवाद केला की, पिठणीच्या लॅपटॉप आणि फोनवर व्हिडिओ तसेच सुशांतच्या खात्यातून अंमली पदार्थांच्या खरेदीशी संबंधित बँक व्यवहारही होते.



पिठणीवर इतर आरोपांसह अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स NDPS कायद्याच्या कलम 27A गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिठाणीने आपल्या जामीन अर्जात असेही म्हटले आहे की आपल्याविरुद्ध कलम 27A चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले असेही म्हटले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित पिठाणी हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. त्याने सुशांतसोबत एक फ्लॅट शेअर केला होता आणि सुशांतच्या मृत्यूवेळी तिथेच होता. 26 मे 2021 रोजी हैदराबादमधून त्याला पकडण्यापूर्वी त्याला तीनदा समन्स बजावण्यात आले होते. NDPS कायद्याच्या कलम 8(c), 20(b)(ii), 22, 27A, 28, 29 आणि 30 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. हैदराबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळाल्यानंतर, त्याला एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले, त्यांनी त्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. पिठाणीला त्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जूनमध्ये 15 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता.तसेच हेही लक्षात घेण्यासारखे आहे की बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक मृत्यूनंतर एनसीबीने फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग कनेक्शनची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्याचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटक करण्यात आली होती. सध्या बहुतांश आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात श्रद्धा कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, भारती सिंग यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती.



सिद्धार्थने घेतले होते सुशांतच्या बहिणींची नावं-अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना 14 तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे देखील सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते.




सिद्धार्थचा खुलासा-अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याच्या केलेल्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तीन आयटी प्रोफेशनल्सना संपर्क केला गेला होता, एक जण घरी आला होता. माझ्या माहितीप्रमाणे रिया किंवा इतर कुणी बोलावलं असेल. ज्यावेळी डाटा नष्ट केला जात होता, तेव्हा तिथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थ पिठाणी याने सांगितले होते.










ABOUT THE AUTHOR

...view details