मुंबई -अभिनेत्री अनन्या पांडे हिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते, त्यानंतर अनन्या आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयाकडे रवाना झाली आहे.
हेही वाचा -अडेलतट्टूपणे वागल्या तर विमा कंपन्यांवर गुन्हेच दाखल करणार - अजित पवार
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती घेतली. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. एनसीबीने अनन्या पांडेला (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून अनन्या पांडेच्या घराची झडती घेण्यात येत आहे. तसेच, अनन्या पांडेला आज एनसीबीने चौकशीकरिता कार्यालयामध्ये बोलवले. त्यानंतर एनसीबीची टीम शाहरूख खानच्या मन्नत या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.