महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालाडच्या कुरार येथील झोपडपट्ट्यांवर कारवाई; अतुल भातखळकरांसह नागिरकांना घेतलं ताब्यात - मनीषा चौधरी

शहरातील मालाडमधील कुरार येथे मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील झोपड्यांवर आज सकाळी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला. या कारवाईत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागिरकांना घेतलं ताब्यात
नागिरकांना घेतलं ताब्यात

By

Published : Jul 17, 2021, 3:47 PM IST

मुंबई -शहरातील मालाडमधील कुरार येथे मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील झोपड्यांवर आज सकाळी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला. या कारवाईत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालाडच्या कुरार येथील झोपडपट्ट्यांवर कारवाई

आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा -

पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं, असे अतुल भातखळकर म्हणाले. त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या ताफ्याने ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढले. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतले, असेही भातखळकर यावेळी म्हणाले.

कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी -

हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळीच कारवाई करण्यात आली. त्याठिकाणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली. समन्वयाचा अभाव असल्याने कुरार घरांवर कारवाई करण्यात आली असून, अशा जुलमी पद्धतीने पाडकाम करणे योग्य नाही, असे दरेकर यांनी सांगितले बोरीवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धरणे प्रदर्शन करण्यात आले. सरकारच्या विरोधात नारेबाजी देखील केली. उद्धव सरकार मोगलशाही करत असल्याचा आरोप आमदार मनीषा चौधरी यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details