मुंबई -काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान ( Former Minister Naseem Khan) तसेच चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांनी नुकतीच नवी दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट ( Chandrakant Handore meets Rahul Gandhi ) घेतली. या भेटीत त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत निवडणुकीत दगाबाजी झाल्याची माहिती दिली. या दगाबाजीची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे नसीम खान यांनी सांगितले. गेल्या एक महिनाभरात राज्यात विविध घटना घडल्या आहेत. या घटना संदर्भात माहिती देण्यासाठी आपण पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषद निवडणुकीत 29 मते पहिल्या पसंतीची देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यांना प्रत्यक्षात 22 मतेच मिळाली तर बाकीच्या मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. अशा पद्धतीने पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाला धुडकावणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी तसेच या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या प्रदेश पक्ष नेतृत्वावर ही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -'संदीपान भूमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं.. CCTV फुटेज देतो - संजय राऊत