मुंबई - मुंबईतील बहुचर्चित साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणातील ( Sakinaka rape case ) आरोपीला आज दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले ( Dindoshi Sessions Court ) आहे. आरोपीला 2 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज (सोमवार) झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
पोलिसांनी केले होते दोषारोप पत्र दाखल - साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करत तिची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणची गंभीर दखल ही राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतल्यानंतर हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांनीही या प्रकरणात तातडीने दोषारोप पत्र दाखल केले होते.
पीडित महिलेल्या दिली होती 20 लाखांची मदत - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. महिलेवर बलात्कार करून आरोपींचे तिथून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून आरोपीला पकडण्यात आले होते. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांवर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक आरोप देखील करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोग का पासून या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या होत्या. तसेच राज्य सरकारवर टीका देखील करण्यात आली होती. राज्य सरकारकडून पीडित महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींना 20 लाखांची मदत देण्यात आली होती.