मुंबई -बुलीबाई अॅप प्रकरणातील ( Bulli Bai App Case ) आरोपी यांच्या जामीन अर्जावर सोमवारी ( Bulli Bai App Case Accused Bail Hearing ) सुनावणी झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला. सुल्ली डील याॲपमध्ये देखील हे आरोपी सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा बांद्रा कोर्टात मुंबई पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळे आज पुन्हा आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखीव ठेवत, यासंदर्भातील निकाल 20 जानेवारी रोजी सुनावणार असल्याचे म्हटले आहे.
3 आरोपींना अटक -
बुलीबाई अॅपच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायाशी निगडित नावे वापरली होती. समाजातील एकात्मता आणि सलोखा भंग व्हावा, हा या आरोपींचा उद्देश असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. मुस्लीम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुल्लीबाई या अॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या जामीन अर्जाला पोलिसांचा विरोध -