मुंबई - प्रेमसंबंधातून झालेल्या वादामुळे एकाने 55 वर्षांच्या महिलेचा गळा चिरला. यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीविरोधात कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित महिला मालाड परिसरातील पुष्प पार्क या इमारतीत जेवण बनवण्याचे काम करते. गेल्या पंधरा वर्षांपासून पीडितेचे एका 58 वर्षांच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्याला महिलेच्या आईचा विरोध असल्यामुळे या दोघांमध्ये सतत खटके उडायचे. पीडित महिलेला यासंदर्भात आरोपीकडून सतत त्रास देण्यात येत होता. तसेच मारहाण देखील करण्यात येत होती.
महिलेचा गळा चिरून आरोपीने तोंडात फोडला सुतळी बॉम्ब; प्रेमसंबंधातून कृत्य - mumbai crime news
प्रेमसंबंधांमध्ये अडचणी आल्यानंतर एका 58 वर्षांच्या प्रियकराने विचित्र कृत्य करत 55 वर्षांच्या प्रेयसीचा गळा चिरल्याचा प्रकार कुरारमध्ये समोर आलाय.
महिलेचा गळा चिरून आरोपीने तोंडात फोडला सुतळी बॉम्ब; प्रेमसंबंधातून कृत्य
स्वत:च्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब
या प्रकरणातील आरोपी हा चालक आहे. रविवारी (दि.15 नोव्हेंबर) पीडित महिलेचे आरोपीसोबत पुन्हा भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने पीडितेच्या गळ्यावर चाकू फिरवून तिला गंभीर जखमी केले. यानंतर स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून तो पेटवून स्वतःलाही गंभीर जखमी करून घेतले. या दोघांवर मुंबईतील कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.