महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minor Girl Rape in Mumbai : धक्कादायक : 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार - Accused arrested for sexually abusing

मुंबईतील घाटकोपर परिसरात 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ( Sexually Abusing Minor Girl in Ghatkopar ) घडली आहे. घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Sexually Abusing Minor Girl in Ghatkopar
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

By

Published : Apr 28, 2022, 12:07 PM IST

Updated : Apr 28, 2022, 12:22 PM IST

मुंबई -मुंबईतील घाटकोपर परिसरात 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ( Sexually Abusing Minor Girl in Ghatkopar ) घडली आहे. घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी सचिन अनंत शामा 35 वर्षीय आरोपीला अटक केली.

पोलिस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

घाटकोपरमधील आनंद नगर विभागात पीडित -ही मुलगी मंगळवारी घराजवळच्या दुकानात वडापाव आणण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपीने सात वर्षांच्या पीडित मुलीला फूस लावली. दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नराधम मुलीला घेऊन गेला. या घटनेनंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिले आणि पोलिसांना तसेच तिच्या नातेवाईकांना कळवले. पोलिसांनी लगेचच मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

कोरोना काळात आहेत पाच गुन्हे दाखल - लैंगिक अत्याचार करणारा 32 वर्षीय आरोपी सचिन हा टेम्पो चालक आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पोलिसांना आरोपीचा फोटो मिळाला. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला 24 तासांच्या आत अटक केली. आरोपी सचिन अनंत शामा याच्यावर अशाप्रकारचे पाच गुन्हे दाखल असून तो कोरोना काळामध्ये कोठडीतून बाहेर आला होता. आरोपीवर घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट याठिकाणी गुन्हे दाखल आहे. या प्रकरणाचा तपास घाटकोपर पोलीस करत आहे.

हेही वाचा -Chemicals Exports : भारत जगात सहाव्या क्रमांकावर! रासायनिक निर्यातीने गाठला उच्चांक

Last Updated : Apr 28, 2022, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details