महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2022, 6:13 PM IST

Updated : Sep 30, 2022, 11:01 PM IST

ETV Bharat / city

ISIS Related Accuse Acquitted: पाकिस्तानी संघटनेत तरुणांना शामिल केल्याचा आरोप, 6 वर्षानंतर आरोपीची निर्दोष सुटका

ISIS Related Accuse Acquitted: पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये तरुणांची भरती करण्याचा आरोपाखाली अटक आरोपीला न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला आहे. इस्लाम धर्म कट्टरपंथीय Radical Islam तसेच दहशतवादी संघटनेत काम करण्याकरिता प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली 2016 मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी अर्शी कुरेशीची मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

Accused Acquitted
Accused Acquitted

मुंबई:पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये तरुणांची भरती करण्याचा आरोपाखाली अटक आरोपीला न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला आहे. इस्लाम धर्म कट्टरपंथीय Radical Islam तसेच दहशतवादी संघटनेत काम करण्याकरिता प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली 2016 मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी अर्शी कुरेशीची मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पाठबळ देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखलएनआयएने आरोपी विरोधात दहशतवादी विरोधी कारवाईला प्रोत्साहन देण्यात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. भारताविरुद्ध द्वेष पसरवल्याबद्दल आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS ला त्याच्या कारवायांना पाठबळ देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होते. विशेष एनआयए न्यायाधीश ए एम पाटील यांनी कुरेशीला सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

भारताविरुद्ध द्वेष पसरवण्यात गुंतलाकथित ISIS सदस्य अश्फाकच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कुरेशीसह इतर दोघांना अटक करण्यात आली होती. कुरेशीवर अश्फाकला इसिसमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. कुरेशी बेकायदेशीर कृत्यांमध्ये आणि भारताविरुद्ध द्वेष पसरवण्यात गुंतला होता. आणि ISIS च्या कारवायांना पुढे करत होता, असा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

4000 पानांचे आरोपपत्र दाखलअशफाकचे वडील अब्दुल खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणात एनआयएने कुरेशीविरुद्ध 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खान यांनी तक्रारीत आरोप केला होता, की कुरेशी यांनी आपल्या मुलाला कट्टरपंथी बनवले आहे. केरळमधील मौलवी मोहम्मद हनीफ आणि या प्रकरणातील आणखी एक संशयित रिझवान खान असा आरोप आहे. अशफाक व्यतिरिक्त आरोपींनी केरळमधील इतर 21 तरुणांना कट्टरपंथी केले, जे कथितरित्या ISIS मध्ये सामील झाले असे म्हटले होते.

मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला कुरेशी यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे न मिळाल्याने मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कुरेशी यांनी इस्लामिक रिसर्च फाउंडेशनमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले होते. अब्दुल नावाच्या व्यक्तीने त्याचा मुलगा अशफाक मजीद याला प्रवृत्त केल्याच्या आरोपाच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

गेल्यावर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते की, नाईकने विविध माध्यमांतून जगभरातील लाखो लोकांना मूलभूत विधाने केली होती. अशा भाषणांमधून आणि विधानांद्वारे झाकीर नाईक धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व, द्वेषाला प्रोत्साहन देत आहे. भारत आणि परदेशात एका विशिष्ट धर्माच्या तरुणांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रेरित करत आहे, असा दावा गृह मंत्रालयाने केला आहे.

21 तरुणांना कट्टरपंथी केलेअशफाकचे वडील अब्दुल खान, नागपाडा येथील व्यापारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर एनआयएचे कुरेशीविरुद्ध 4000 पानांचे आरोपपत्र आहे. खान यांनी तक्रारीत आरोप केला होता की, कुरेशी यांनी आपल्या मुलाला कट्टरपंथी बनवले आहे. केरळमधील मौलवी मोहम्मद हनीफ आणि या प्रकरणातील आणखी एक संशयित रिझवान खान, असा आरोप आहे. अशफाक व्यतिरिक्त, आरोपींनी केरळमधील इतर 21 तरुणांना कट्टरपंथी केले, जे कथितरित्या ISIS मध्ये सामील झाले होते.

तपास अद्याप सुरूखानचा आरोप आहे की, आरोपींनी आपल्या मुलाला आणि इतरांना ISIS मध्ये सामील होण्यासाठी भारतातून पळून जाण्यास मदत केली. एजन्सीने हनीफ आणि खान यांचा आरोपपत्रात समावेश केला नाही. कारण त्यांच्याविरुद्धचा तपास अद्याप सुरू आहे. तथापि त्यात अब्दुल रशीद अब्दुल्लाचे नाव फरार आरोपी म्हणून आहे. कथितरित्या इतर तरुणांवर प्रभाव टाकून ISIS मध्ये सामील होण्यासाठी भारत सोडला आहे.

Last Updated : Sep 30, 2022, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details