महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Balasahebanchi Shivsena : 'बाळासाहेबांची शिवसेना' नावावर ठाकरे कुटुंब आक्षेप घेणार का? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष असे नवीन नाव मिळाले आहे. मात्र या नावांमध्ये असलेल्या बाळासाहेब हे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांचं नाव वापरण्याआधी ठाकरे कुटुंबीयाची परवानगी असणे गरजेचे आहे जर ती परवानगी नसल्यास ठाकरे कुटुंबीय याबाबत कायदेशीर आक्षेप घेऊ शकतो ,असं मत कायदे तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

thackeray family may object to Balasaheb Shiv Sena name
बाळासाहेबांची शिवसेना नावावर ठाकरे कुटुंब आक्षेप घेऊ शकतो ,असं मत कायदे तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

By

Published : Oct 11, 2022, 4:40 PM IST

मुंबई -एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष असे नवीन नाव मिळाले आहे. मात्र या नावामध्ये असलेल्या बाळासाहेब हे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांचं नाव वापरण्याआधी ठाकरे कुटुंबीयाची परवानगी असणे गरजेचे आहे जर ती परवानगी नसल्यास ठाकरे कुटुंबीय याबाबत कायदेशीर आक्षेप घेऊ ( objection to Balasaheb's Shiv Sena name ) शकतो ,असं मत कायदे तज्ञांनी व्यक्त केल आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला नेमकं कोणती चिन्ह मिळणार आणि पक्षाला कोणती नावे मिळणार यावर उत्सुकता होती. ती उत्सुकता आता संपली असून उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला असून त्यांच्या पक्षासाठी "धगधगती मशाल" हे चिन्ह देण्यात आला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना - केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला "बाळासाहेबांची शिवसेना" असे पक्षाला नाव दिले आहे. तसेच निशाणीसाठी आधी दिलेले तीन पर्याय रद्द केल्यानंतर निशाणीसाठी तीन पर्याय सुचवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे पक्षाचे नाव देण्यात आले असलं तरी या नावावर देखील ठाकरे कुटुंबीय आक्षेप घेऊ शकतात का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना नावावर ठाकरे कुटुंब आक्षेप घेऊ शकतो ,असं मत कायदे तज्ञांनी व्यक्त केलं आहे.


अनेक पक्षात फूट - देशात यापूर्वी अनेक पक्षांत फुट पडल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे. काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोक जनशक्ती पार्टी जनता संघ असे अनेक मोठे पक्षात फूट पडली. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्या दोन गटांना नाव देण्यात आली आहेत त्यापैकी एकनाथ शिंदे गटाला मिळालेले नाव म्हणजे "बाळासाहेबांची शिवसेना" असा आहे. बाळासाहेब हे महापुरुष आहेत तसेच त्यांच्यात जुन्या शिवसेनेतून फुटून काही लोकांनी वेगळा गट तयार करून त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळालं आहे.

ठाकरे कुटुंबाला आक्षेपचा अधिकार - एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असा त्यांच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नाव देण्यात आले आहे. मात्र या पक्षाच्या नावामध्ये असलेले बाळासाहेब हे नाव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांनी ठरवले तर केंद्रीय निवडणूक आयोगानी दिलेल्या या नावावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, असं मत कायदेतज्ञ एड. नितीन सातपुते यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष म्हणून गणले जातात. मात्र तरीही त्यांच्या नावाचा इतर राजकीय पक्षाने वापर करण्याआधी त्यांच्या कुटुंबाची सहमती घेणे गरजेचे आहे कारण ते एका कुटुंबाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या संमतीबाबत कायदेशीर पूर्तता केल्यानंतरच असे नाव लावले जाऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारेवर संबंधित पक्ष चालत असला तरी पुढे जाऊन त्या नावाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याबाबत शाश्वती देता येत नाही. त्यामुळेच बाळासाहेब या नावावर आक्षेप घेण्याचा पूर्ण अधिकार ठाकरे कुटुंबीयांना आहे असेही नितीन सातपुते सांगतात.



भविष्यात आक्षेप घेतला जाऊ शकतो - एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना असा त्यांच्या पक्षाला नाव दिला आहे. त्यातील नेमके बाळासाहेब म्हणजे कोण हे अद्यापही स्पष्ट नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे त्या नावात बाळासाहेब ठाकरे हे देखील मानत नाही मात्र भविष्यात बाळासाहेब या नावावर आक्षेप घेण्याबाबत ठाकरे कुटुंबीय नक्कीच निर्णय घेऊ शकतील त्याबाबत कायदेशीर बाबी देखील तपासल्या जातील असे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details